विशेष प्रतिनिधी
पुणे :- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात खलिल शेख यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेली एक चिठ्ठी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.Ravindra Dhangekar
खलील शेख हे लेबर कॉन्ट्र्रॅक्टर होते . त्यांनी ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली त्याच इमारतीच्या बाहेरच्या बाजूला चिठ्ठी चिटकवली होती. आणखी एक चिठ्ठी त्यांच्या खिशात होती. पोलिसांनी ही सदरची चिठ्ठी पाहिली आणि त्यानंतर खलील शेख यांचा मृतदेह ससूनला पाठवण्यात आला. यानंतर काल संध्याकाळी खलील शेख यांच्या पत्नीने केलेल्या तक्रारानुसार 14 जणांविरोधात फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.
खलील शेख 2011 पासून पुण्यात बांधकामाचे कामे करत होता. तो आरोपींकडे सेंट्रिगचं काम करत होते . खलील शेख यांनी या कामासाठी बाहेरुन व्याजाने पैसे उचलेल होते. आम्ही व्याजासहित पैसे दऊ, असे आश्वासन या सगळ्यांनी दिले होते. मात्र, उत्कर्ष असोसिएट या फर्मने कामाचे कोणतेही पैसे न दिल्याने खलील तणावात होते . उत्कर्ष असोसिएट ही जी फर्म आहे, त्याठिकाणी रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळा शेडगे, रघू गौडा यांची पत्नी भागीदार आहेत. खलील यांच्या आत्महत्येनंतर धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी मी त्या फर्ममध्ये भागीदार होते, सर्व कारभार रवींद्र धंगेकर हेच पाहत होते असे सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खलील शेख एका व्यक्तीकडे पैशासाठी खेटे मारत होते , पण कोणीही त्यांचे पैसे देत नव्हते. खलील शेख यांच्या पत्नीने 14 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. खलील शेख यांनी चिठ्ठीत अडीच कोटी रुपयांचे येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर आहे. याप्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करू असे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले .आत्महत्या केलेल्या व्यक्तीने यापूर्वी कधीही पोलीस तक्रार केलेली नाही. त्यामुळे आता या प्रकरणात वेगळीच काही माहिती समोर येणार का, हे बघावे लागेल.
Trouble mounting for Ravindra Dhangekar? Police obtain suicide note written by Khalil Shaikh.
महत्वाच्या बातम्या
- मोशी दुर्घटना प्रकरणात हलगर्जीपणा, महापालिका आयुक्तांना निलंबित करा : सुषमा अंधारे यांची मागणी
- Vijaya Rahatkar : उझबेकिस्तानातील वैद्यकीय विद्यार्थिनीच्या मृत्यूची राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वतःहून दखल
- भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला; कोयताधारी हल्लेखोर फरार
- Sassoon Hospital : ससून रुग्णालयात धार्मिक प्रचार करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा