Shahrukh Khan : शाहरुख खानला ‘जवान’साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार, विक्रांत मॅसीचाही गौरव
अखेर शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीतले एक मोठे शिखर गाठले असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शाहरुखने हा पुरस्कार स्वीकारला.











