Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sanjay Raut
महाराष्ट्र

विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा नाही हक्क , संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला ठणकावले

विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना ठाकरे गट आपला दावा असे म्हणणार नाही पण आपला हक्क सांगणार आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला ठणकावले आहे.

Mahila Jagar Samiti
पुणे

स्वारगेट बलात्कार प्रकरणात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन

स्वारगेट बस स्थानाकात बलात्कार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्याने सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. पुण्यात महिला जागर समितीकडून तिरडी आंदोलन करत या अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यात आला. आरोपी दत्ता गाडे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिला आंदोलकांनी केली आहे.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : कितीही उलट सुलट प्रश्न विचारा आम्ही एकत्र, अजित पवार माध्यमांवरच घसरले

तुम्ही किती उलट सुलट प्रश्न विचारा. तुम्ही काही केलं तरी आम्ही एकत्र राहण्याचे ठरवले आहे. खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनाच खडसावले.

Ashish Shelar
महाराष्ट्र

Ashish Shelar : गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

गद्दारीचे जनक हे उद्धव ठाकरेच आहेत. ते लढले आमच्यासोबत आणि गेले दुसऱ्यासोबत, ही गद्दारी नाही का? असा सत्तेत बसण्यासाठी वडलांचे विचार सोडले ही गद्दारी नाही का? असा सवाल वक्तव्य भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केला आहे.

Bhaskar Jadhav
महाराष्ट्र

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची बंधू शिवसेनेत गेले की पाठवले? कोकणात ठाकरे गटाला धक्का

कोकणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. दापोलीच्या १४ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे कोकणातील ठाकरे गटाचे एकमेव आमदार भास्कर जाधव यांचे बंधू बाळाशेठ जाधव यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना पाठवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

IPS Police 
महाराष्ट्र

IPS Police : राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांना बढती

राज्य पोलीस दलातील 11 आयपीएस पोलीस अधिकार्‍यांच्या गृहविभागाने बढती देऊन बदल्या केल्या आहेत. पाच पोलीस अधिकार्‍यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देण्यात आली आहे. काहींना त्याच ठिकाणी बदली दाखविण्यात आली आहे.

summer
मुंबई

Summer घामाच्या धारांची ठेवा तयारी, यंदाचा उन्हाळा सर्वात उष्ण

भारतीयांना यंदाच्या उन्हाळ्यात घामाच्या धारांची तयारी ठेवावी लागणार आहे. कारणयंदाच्या उन्हाळ्यात (मार्च ते मे) देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील.

महाराष्ट्र

मतदार याद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार

विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा युतीचे हे फिक्सिंग सरकार आहे. मतदारयाद्यांच्या घोटाळ्याची माहिती देण्यासाठी काँग्रेस पक्ष जनजागृती अभियान करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

देश-विदेश

महिलांसाठी केवळ कायदे पुरेसे नाही, योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे आवाहन

महिलांसाठी केवळ कायदे करून काही होणार नाही. अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला हवी असे मत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र

जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला माझीच लाज वाटतेय. स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत…

आता मला माझीच लाज वाटतेय. आपण स्वत:ला मर्द का म्हणवून घेत आहोत, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

Swargate rape case
महाराष्ट्र

Swargate rape case : दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध, स्वारगेट बलात्कार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलाचा दावा

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बस मध्ये दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे. तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, तरुणी स्वतःहुन बसमध्ये चढली, असाही दावा आरोपीच्या वकिलाने केला आहे.

Badrinath
देश-विदेश

Badrinath : बद्रीनाथजवळ हिमनदीला पूर आल्याने कडा कोसळून 57 कामगार अडकल्याची भीती

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माणा गावाजवळील एका हिमनदीतून आलेल्या पूरामुळे मोठा हिमकडा कोसळला. या घटनेत सीमा रस्ते संघटना (BRO) चे 57 कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी 16 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.