Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

पुणे

स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकावणार, एकनाथ शिंदे यांची संतप्त प्रतिक्रिया

लाडक्या बहिणी सुरक्षित राहाव्या हीच सरकारची भूमिका आहे. आरोपीचे कुणाशीही संबंध असले तरी त्याची गय केली जाणार नाही. स्वारगेट बलात्कार घटनेतील आरोपीला फासावर लटकवणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Swargate rape case
पुणे

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट गावाला पोलीस छावणीचे स्वरूप

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या गुणाट या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.गुणाट परिसरातील शेतात लपवून बसला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी श्वान पथक बोलावले आहे.

Pratap Saranaik
महाराष्ट्र

Pratap Saranaik एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एसटी महामंडळाकडे असलेल्या 14,300 एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Yogesh Kadam
महाराष्ट्र

Yogesh Kadam : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे संभाव्य लोकेशन सापडले, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचे संभाव्य लोकेशन सापडले आहे. लोकेशननुसार त्याला फॉलो केले जात आहे. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला,

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : अजित पवार यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार

अनेक वर्षे सरकारे आली आणि गेली, परंतु मराठी माणसाला अभिमान वाटेल, असा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेऊन महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद दिला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवादही दिले.

मुंबई

मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!

कुलाबा येथील डिफेन्स क्लबमध्ये झालेल्या ७८ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेविरुद्ध भारतीय नौदलाने पोलिस तक्रार दाखल केली आहे. युनायटेड सर्व्हिसेस क्लब (यूएसआय) मध्ये झालेल्या घोटाळ्यात संरक्षण विभागाशी संबंधित एका महिलेचा सहभाग असल्याचे संकेत आहेत.

Kirit Somaiya
महाराष्ट्र

Kirit Somaiya : सिल्लोडमध्ये बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप

राज्यातील वेगवेगळ्या भागात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस येत आहे. या घुसखोरांची पाळेमुळे सिल्लोडपर्यंत पोहोचली आहेत. माजी खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड येथील जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

Swargate rape case
पुणे

Swargate rape case स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पकडून देणाऱ्यास एक लाखाचे इनाम

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला अटक करण्यासाठी पुणे पोलिसांनी नागरिकांची मदत मागितली आहे. आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास 1 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Swargate bus stand
महाराष्ट्र

Swargate bus stand : स्वारगेट बसस्थानकातील 23 सुरक्षा रक्षक निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशीचे परिवहन मंत्र्यांचे आदेश

स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. स्वारगेट येथील 23 सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन करण्यात आलेले आहे.

देश-विदेश, पुणे

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली स्वारगेट बलात्कार प्रकरणाची घेतली दखल , अध्यक्षा विजया रहाटकर यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांनी या प्रकरणी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Jayant Patil
महाराष्ट्र

Jayant Patil : महत्वाची बातमी किल करण्यासाठी..पक्षांतराच्या चर्चेवर जयंत पाटील यांचा माध्यमांवरच मोठा आरोप

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. यावरून जयंत पाटील यांनी माध्यमांवर चांगलीच आगपाखड केली आहे. एखादी महत्त्वाची बातमी किल करायची असेल तर असे प्रकार वारंवार घडतात असा माझा अनुभव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुणे

संघ समजावून घेण्यासाठी “आम्ही संघात का आहोत” पुस्तक उपयुक्त : दिलीप क्षीरसागर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या पृष्ठभूमीवर पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत हे पुस्तक संघ समजावून घेऊन इच्छिणाऱ्या व संघात अनेक वर्ष असलेल्यांना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी येथे बोलताना केले.