Sinhagad Fort : सिंहगडावर मधमाशांचा थरार! दीड वर्षाच्या बालकासह एकाच कुटुंबातील चौघे जखमी; पर्यटकांची मोठी धावपळ!
ऐतिहासिक किल्ले सिंहगडावर आज दुपारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. या भीषण घटनेत एका दीड वर्षाच्या बालकासह अनेक पर्यटक जखमी झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या आपत्ती व्यवस्थापन पथक गडावर तैनात आहे.











