Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Sunetra Pawar
मुंबई

Sunetra Pawar : महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा योजना, सुनेत्रा पवार यांची घोषणा

महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना लागू करण्याचा निर्णय नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात बोलतानाजाहीर केला. या घोषणेमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई

Musical Road : मुंबईतील म्युझिकल रोड वादाच्या भोवऱ्यात; रहिवाशांचा आवाजामुळे त्रास होत असल्याचा आरोप, पालिका आयुक्त यांना पत्र

मुंबईमध्ये नुकतेच सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले म्यूजिकल रोड अवघ्या महिनाभरातच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या रस्त्यात कोणताही तांत्रिक बिघाड झालेला नसला तरी, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या संगीताच्या आवाजामुळे परिसरातील 650 हुन अधिक कुटुंबे त्रस्त असल्याचा दावा स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

पुणे

India’s internet services : मध्यपूर्वेतील तणावाचा भारताच्या इंटरनेट सेवांवर परिणाम? समुद्राखालील केबल नेटवर्कवर वाढला धोका

भारताच्या इंटरनेट सेवेला आधार देणाऱ्या ऑप्टिक फायबर पायाभूत सुविधांवर गंभीर धोके निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः समुद्राखालील (Undersea) केबल नेटवर्कवर वाढलेला धोका भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरू शकतो. जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय डेटा ट्रॅफिकपैकी ९९ टक्क्यांहून अधिक डेटा या समुद्राखालील केबल्समधून प्रवास करत असल्यामुळे या नेटवर्कची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

Uncategorized, पुणे

Gas Shortage : गॅसटंचाईचे संकट : पुण्यातील ८० टक्के हॉटेल बंद होण्याची भीती

पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याची झळ आता पुण्यातील हॉटेल उद्योगालाही बसू लागली आहे.

Sayali Surve
पुणे

Sayali Surve ; आंतरधर्मीय विवाहानंतर छळाचा आरोप; सायली सुर्वेची ‘घरवापसी’, नाव बदलून अद्या सुर्वे

पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी आणि २०१९ मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ झाल्याचा आरोप करत पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले.

Land Revenue
मुंबई

Land Revenue : गायरान जमिनींच्या वापरासाठी ऐतिहासिक निर्णय; महसूल संहितेतील सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

महाराष्ट्र विधानसभेत जमीन वापराबाबत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या विधेयकामुळे राज्याच्या जमीन महसूल नियमांमध्ये काळानुरूप बदल करण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रियेतील अनेक अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.

Prakash Solanke
मुंबई

Prakash Solanke : ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुलींचा तुटवडा; फसवणुकीच्या रॅकेटचा आमदार प्रकाश सोळंके यांचा दावा

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चा सुरू असतानाच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील एका गंभीर सामाजिक प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ग्रामीण भागात शेती करणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने परिस्थिती चिंताजनक बनली असून, अनेक ठिकाणी मुलांनाच हुंडा द्यावा लागत असल्याची बाब त्यांनी मांडली.

Ashish shelar
मुंबई

Ashish shelar : पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ लवकरच स्थापन होणार, आशिष शेलार यांची माहिती

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ पुढील अधिवेशनापूर्वी स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली.

Teacher recruitment
पुणे

Teacher recruitment : परीक्षा होऊनही शिक्षक भरती रखडली; ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत भरती तातडीने करा;पुण्यात पात्र उमेदवारांचे आंदोलन

राज्यात शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षा पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला असतानाही अद्याप प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू झालेली नसल्याने पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘पवित्र पोर्टल’ अंतर्गत शिक्षक भरती तातडीने सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी पुण्यात पात्र उमेदवारांनी मोठे आंदोलन केले. राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या उमेदवारांनी आंदोलनात सहभाग घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

मुंबई

devendra Fadanvis : एका परिवाराच्या गुलामीत आयुष्य गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्र्यांचा मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर पलटवार

ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुलामीत गेले, त्यांनी देशाला सार्वभौम कसे ठेवतात आणि देश कसा चालवतात, हे आम्हाला शिकवू नये, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर केला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम आहेत, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती. 

delhi

Rohit Pawar : बड्या नेत्यांचे व्ही. के. सिंग याला संरक्षण, राेहित पवार यांचा आराेप

व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग याला बड्या नेत्यांचे संरक्षण असल्याचा आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली.

पुणे

Murli Dhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांचे मावसभाऊ निलेश कोंढाळकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी

पुणे महापालिका निवडणुकीत मावसभाऊ असलेले नीलेश कोंढाळकर यांची उमेदवारी पक्षांतर्गत घडामोडींमुळे कापावी लागली. मात्र केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्याची भरपाई केली असून स्वीकृत नगरसेवक पदी निलेश कोंढाळकर यांना संधी मिळाली आहे.