Sayali Surve ; आंतरधर्मीय विवाहानंतर छळाचा आरोप; सायली सुर्वेची ‘घरवापसी’, नाव बदलून अद्या सुर्वे

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sayali Surve  पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी आणि २०१९ मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झालेली सायली सुर्वे हिने आंतरधर्मीय विवाहानंतर छळ झाल्याचा आरोप करत पुन्हा हिंदू धर्म स्वीकारल्याची घटना समोर आली आहे. शुद्धीकरण विधीनंतर तिचे नाव अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले.Sayali Surve

माध्यमांशी बोलताना अद्या सुर्वे हिने सांगितले की, लग्नासाठी तिच्यावर थेट दबाव टाकण्यात आला नव्हता, मात्र प्रेमाच्या नात्यात तिला संमोहनासारख्या प्रभावाखाली ठेवण्यात आले होते. त्या अवस्थेत तिने स्वतःच्या इच्छेने विवाह केला, असे ती म्हणाली. मात्र संपूर्ण प्रकरण ‘लव्ह जिहाद’चे असल्याचा दावा तिने केला आहे.Sayali Surve

सायलीने सुमारे दहा वर्षांपूर्वी मीरा-भाईंदर येथील उद्योजक आतिफ तासे याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर तिचे नाव बदलून अतेझा तासे ठेवण्यात आले होते. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच हिंदू परंपरा पाळण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध केला जात असल्याचेही तिने सांगितले.Sayali Surve



सायलीच्या म्हणण्यानुसार, चार मुलांच्या भवितव्यासाठी तिने अनेक वर्षे हा त्रास सहन केला. अखेर परिस्थिती असह्य झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पुन्हा हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तिने आपल्या चारही मुलांना देखील हिंदू धर्मात परत आणल्याचे सांगितले.

तिच्या घरवापसीसाठी विधीपूर्वक होम-हवन आणि मंत्रोच्चार करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे तसेच बजरंग दलाचे काही पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सायलीच्या सासू गुलशन पटेल यांनी पती-पत्नीमध्ये वाद होत असतात, असे सांगितले. सायली आजही माझी सून आहे आणि पुढेही राहील, असेही त्यांनी नमूद केले.

सायलीने गेल्या काही वर्षांत झालेल्या कथित अन्यायाविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आता मुलांच्या भवितव्यासाठी ठामपणे उभे राहणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

Pimpri-Chinchwad Woman Sayali Surve Returns to Hinduism, Alleges Harassment After Interfaith Marriage

महत्वाच्या बातम्या