विशेष प्रतिनिधी
पुणे : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर खनिज तेल, एलपीजी आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याची झळ आता पुण्यातील हॉटेल उद्योगालाही बसू लागली आहे. Gas Shortage
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबविण्यात आल्याने पुण्यातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने एलपीजीचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार व्यावसायिक वापरासाठीचे एलपीजी सिलिंडर सध्या उपलब्ध नसून घरगुती ग्राहकांनाही ३० दिवसांतून एकदाच सिलिंडर मागविण्याची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरात गॅसटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर यांनी सांगितले की, सरकारकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासन आवश्यक उपाययोजना करत आहे. एलपीजीचा काळाबाजार रोखण्यासाठी तालुका स्तरावर तपासणी पथके नेमली जाणार असून वितरकांनाही योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.
पुण्यात सुमारे ८ ते १० हजार हॉटेल आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यापैकी जवळपास ८५ टक्के हॉटेल व्यावसायिक एलपीजीवर अवलंबून आहेत, तर उर्वरित हॉटेल पीएनजीचा वापर करतात. अग्निसुरक्षेच्या कारणास्तव हॉटेलमध्ये सिलिंडरचा जादा साठा ठेवता येत नसल्याने बहुतांश हॉटेलकडे केवळ एक ते दोन दिवसांचा गॅस साठा असतो. Gas Shortage
पुणे रेस्टॉरंट्स अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी सांगितले की, सध्या उपलब्ध गॅस संपल्यानंतर शहरातील सुमारे ८० टक्के हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे हॉटेल व्यवसायाला दररोज ८ ते १० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसू शकतो. तसेच या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. Gas Shortage
दरम्यान, पुणे आणि परिसरात *महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)*कडून सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा सध्या सुरळीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र औद्योगिक ग्राहकांनी सीएनजीचा वापर वाढवू नये, अशा सूचना कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच शहरात पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचा तुटवडा नसल्याचे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी स्पष्ट केले आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. Gas Shortage
Gas Shortage Crisis: 80% of Pune Hotels May Shut Down
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- Kalakar Katta : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ वादात नवे वळण; वाहतूक अडथळ्याची अधिकृत नोंदच नाही
- उद्योगपती अनिल अंबानीच्या संबंधित कंपनीवर 15 ठिकाणी ईडीचे छापेमारी
- साेशल मीडियावर व्हायरल वक्तव्य प्रकरणी वसंत माेरे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा