Murli Dhar Mohol : मुरलीधर मोहोळ यांचे मावसभाऊ निलेश कोंढाळकर यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत मावसभाऊ असलेले नीलेश कोंढाळकर यांची उमेदवारी पक्षांतर्गत घडामोडींमुळे कापावी लागली. मात्र केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी त्याची भरपाई केली असून स्वीकृत नगरसेवक पदी निलेश कोंढाळकर यांना संधी मिळाली आहे. Murli Dhar Mohol

पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवक नियुक्ती आज जाहीर झाल्या.भाजपकडून निलेश कोंढाळकर यांच्यासह प्रियंका शेंडगे, विश्वास नानावरे, राजेंद्र काकडे, रवी साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसकडून सुनील शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. Murli Dhar Mohol



नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या यादीत प्रभाग क्रमांक ३१, मयूर कॉलनी – कोथरुड मधून पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड यांची नावे निश्चित करण्यात आली होती. मात्र कोंढाळकर यांची उमेदवारी कापण्यात आली. महापालिकेची निवडणुकीची सर्व सुत्रे हातात असतानाही मोहोळ यांच्या मावसभावाचेच तिकीट कापण्यात आले होते. मात्र आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. Murli Dhar Mohol

Murli Dhar Mohol’s Cousin Nilesh Kondhalkar Appointed Nominated Councillor in Pune

महत्वाच्या बातम्या