Nirmala Sitharaman : इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 247 वर गैरसमज; ‘ईमेल-व्हॉट्सॲप वाचण्याचा अधिकार’ दावा भ्रामक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Nirmala Sitharaman सोशल मीडियावर सध्या असा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की, केंद्र सरकार इन्कम टॅक्स कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स आणि खासगी डिजिटल संवाद तपासू शकणार आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे दावे दिशाभूल करणारे असून वास्तवाशी त्यांचा थेट संबंध नाही.Nirmala Sitharaman

इन्कम टॅक्स कायदा 2025 मधील कलम 247 संदर्भात पसरवले जाणारे दावे अतिशयोक्त असून, हे कलम कोणत्याही सामान्य नागरिकांवर थेट ‘नजर’ ठेवण्याचा अधिकार देत नाही. हे कलम 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या इन्कम टॅक्स कायद्याचा भाग असून, ते 1961 च्या जुन्या कायद्यातील कलम 132 (झडती व जप्ती) चेच अद्ययावत रूप आहे.
तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, कलम 247 अंतर्गत कारवाई केवळ त्या करदात्यांविरोधातच होऊ शकते, ज्यांच्याविरोधात आधीच अधिकृत नोटीस, समन्स किंवा चौकशी सुरू आहे आणि ज्यांच्याकडे उत्पन्न लपवणे, मालमत्ता दडवणे किंवा महत्त्वाची कागदपत्रे लपवण्याचा ठोस संशय आहे. कोणत्याही सामान्य व्यक्तीचा मोबाईल, ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंट अचानक तपासण्याचा अधिकार या कायद्यात नाही.Nirmala Sitharaman



डिजिटल युगात करचुकवेगिरीचे स्वरूप बदलले असून, व्यवहार ई-वॉलेट्स, ट्रेडिंग अ‍ॅप्स, क्लाऊड स्टोरेज, ईमेल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘व्हर्च्युअल डिजिटल स्पेस’ हा शब्द कायद्यात समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे आधीपासून असलेल्या अधिकारांचेच डिजिटल स्वरूपात स्पष्टीकरण करण्यात आले आहे, असे जाणकारांचे मत आहे.

या कायद्याविरोधात काही टीकाकारांनी ‘गोपनीयतेवर गदा’ येण्याचा आरोप केला असला, तरी कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे की, ही कारवाई केवळ कायदेशीर चौकशीच्या चौकटीतच होऊ शकते. त्यामुळे ‘सरकार आता सर्वांचे ईमेल आणि चॅट्स वाचणार’ हा दावा चुकीचा आणि भीती पसरवणारा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, करचुकवेगिरी रोखण्यासाठी डिजिटल पुरावे तपासण्याची गरज लक्षात घेऊनच ही तरतूद करण्यात आली असून, ती नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत नाही.

Misconceptions Over Income Tax Act Section 247; Claims of ‘Email–WhatsApp Snooping Powers’ Are Misleading

महत्वाच्या बातम्या