विशेष प्रतिनिधी
नागपूर : राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक कंपनीत रविवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 19 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणात कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकासह 21 लोकांवर एफआयआर करण्यात आला असून 11 जणांना अटक झाली आहे. या घटनेमध्ये कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटाप्रकरणी आमदार शशिकांत शिंदे, आमदार अभिजित वंजारी आणि आमदार सचिन अहीर यांनी 93 अन्वये प्रस्ताव मांडून विधान परिषदेत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र सभापती राम शिंदे यांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळला. विषय गंभीर असल्याने सभागृहात मुद्दा मांडण्याची परवानगी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनी झालेल्या स्फोटाप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईबाबत माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काटोलच्या एसबीएल कंपनीमध्ये जवळपास 19 कामगारांचा मृत्यू झालेला असून 17 जण गंभीर जखमी आहेत. बहुतांश कामगार या महिला आहेत. त्यामुळे कंपनीतर्फे 75 लाख रुपये राज्याकडून 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारच्यावतीने 2 लाख रुपये असे मृतकांच्या कुटुंबाला आपण देतो आहोत. जे जखमी आहे, त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि त्यांचा उपचाराचा खर्च हे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला आहे. तसेच या घटनेसंदर्भात जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण एफआर दाखल केलेला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एसबीएलच्या घटनेमध्ये काही गोष्टींचा निष्काळजीपणा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. निष्काळजीपणा नसेल तर पहिल्यांदा आपण अपघाताचा त्या ठिकाणी उल्लेख करतो आणि त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो. पण या घटनेमध्ये प्राथमिक निष्काळजीपणा पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे कारवाई केली आहे. 21 लोकांवर एफआयआर करण्यात आला असून 11 लोकांना अटक झाली आहे. यात एमडीचा देखील समावेश आहे. त्यामुळे या घटनेमध्ये कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
11 people arrested in SBL company explosion case, Chief Minister warns that no one will be spared
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई