फुरसुंगी उरुळी देवाची अजित पवार गटाला 32 पैकी 19 जागेवर मोठे यश

विशेष प्रतिनिधी

हडपसर : फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 32 पैकी 19 जागेवर मोठे यश मिळवले. असून राष्ट्रवादीचे संतोष सरोदे हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. Ajit Pawar

शिवसेना शिंदे गटाला 8 भारतीय जनता पार्टी 5 जागेवर समाधान मानावे लागले. मत मोजणीच्या आठ फेऱ्या झाल्या. नगरपरिषद झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती या निवडणुकीसाठी उमेदवाराला दोन टप्प्यात दोन वेळा खर्च करावा लागला. निवडणूक काही उमेदवार इच्छुक उमेदवार न्यायालयात गेल्याने पुढे ढकलण्यात आली होती.

नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 120 उमेदवार रिंगणात होते यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाने सर्व जागा लढवल्या. 16 वार्ड होते. तर नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जातीसाठी जागा राखीव होते. शिवसेना व भाजपची युती होती तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली तर काँग्रेस, आप व बहुजन विकास आघाडी या तिघांनी एक एक जागा लढवली होती. मतमोजणी ला सकाळी दहा ला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती.

नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची धक्कादायक निकालाची झाली, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे तर काहीजण अल्पमतांनी निवडून आले आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे हे विजयी झाले आहेत. संतोष सरोदे यांना २०९०८ मते मिळाली तर शिंदे सेनेचे महेंद्र सरोदे यांनी १८०१० मते मिळवत कडवि झुंज दिली. तेच उबाठा सेनेचे सनी कांबळे यांना ६०५५ मते मिळाली.

Ajit Pawar group wins 19 out of 32 seats in Fursungi Uruli Dev’s party

महत्वाच्या बातम्या