विशेष प्रतिनिधी
चाळीसगाव : शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का बसला असून माजी खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 6 मार्च रोजी मुंबईत शक्तीप्रदर्शन करत ते अधिकृतपणे शिंदे गटात सामील होणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. Unmesh Patil
उन्मेष पाटील यांच्या शिंदे गटात पक्षप्रवेशामुळे जळगाव आणि चाळीसगाव परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.उन्मेष पाटील यांच्या मालमत्तेवर छत्रपती संभाजीनगर येथील एका सहकारी बँकेकडून थकीत कर्जापोटी जप्तीची कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी भूमिका बदलल्याचे बोलले जात आहे. हा निर्णय दबावाखाली घेतला गेला आहे का, असा प्रश्नही काहीजण उपस्थित करत आहेत. मात्र, पाटील यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
2019 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आलेल्या पाटील यांना 2024 मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चाळीसगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली; मात्र त्यांचा पराभव झाला. गेल्या महिन्यात त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेत प्राथमिक चर्चा केली होती. आता 6 मार्च रोजी त्यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
भाजपमधून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यांनी सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांची दिल्लीत भेट घेऊन या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काम करण्याची पद्धत चांगली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांनी 2019 मध्ये खासदारकी मिळवली होती. ती लोकसभा निवडणूक त्यांनी 4 लाख 11 हजार 617 इतक्या विक्रमी मताधिक्याने जिंकली होती, ती महाराष्ट्रात तिसरी सर्वोच्च ठरली होती.
त्याआधी 2014 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ते भाजपकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर 2015 ते 2019 या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने महासंघ लिमिटेडचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.
Big Blow to Thackeray Camp: Former MP Unmesh Patil Set to Join Shinde Sena
महत्वाच्या बातम्या
- Pune Residents : पुणेकरांनो सावधान! होळीला ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ कराल तर थेट पोलीस कोठडी; ३० ठिकाणी कडक नाकेबंदी!
- Eknath Shinde : दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट संवाद
- Anti-Encroachment : अतिक्रमण कारवाईस विराेध महागात, एमआयएमच्या 11 नगरसेवकांवर गुन्हे दाखल
- The Kerala Story 2: द केरला स्टाेरी २ चाही बाॅक्स ऑफिसवर जलवा, पहिल्याच विकेंडला 10.40 कोटींची कमाई