विशेष प्रतिनिधी
अकोट: भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’गटातील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि समर्थकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला.
या प्रभागात तीन जागा “एआयएमआयएम” ने जिंकल्या, तर एकाजागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला. प्रभाग क्रमांक दोन ब मध्ये भाजपचे उमेदवार शरद तुरकर यांनी काँग्रेसचे उमेदवाराचा दोन हजार 200 मतांनी पराभव केला.या विजयामुळे प्रभागातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. त्यातूनच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांची अकोट फैल भागातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर प्रभागात असताना नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला.
भाजप नगरसेवक शरद तुरकर हे सत्कार स्वीकारण्यासाठी एका ठिकाणी जात असताना त्यांच्यावर भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊत यांच्याकडून हल्ला करण्यात आला. दरम्यान, यावेळी वाद चिघळल्याने दोन्ही गटाचे लोक समोरासमोर आले होते. यावेळी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात न आल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे. शरद तुरकर हे हल्ल्यात जखमी झाले असून,त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
BJP’s Winning Corporator Stabbed by Defeated Party Candidate in Same Ward
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन