विशेष प्रतिनिधी
Gopichand Padalkar भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार गाेपीचंद पडळकर यांना जत विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तालुक्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला विराेध केला आहे. त्यांच्याकडून पडळकर यांच्या विराेधात उमेदवारही उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी तालुक्यातील आपले सर्वात माेठे दाेन शत्रूंची जाहीर घाेषणाच केली आहे.Gopichand Padalkar
पडळकर म्हणाले, जत तालुक्याचा दुष्काळ हा माझा एक नंबरचा शत्रू आहे. हा दुष्काळ हटवणं ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. दुसरा शत्रू हा ऊस तोडणारा कोयता आहे. कारण जत तालुक्यातील जवळपास 35 हजार बांधव हे ऊस तोडीसाठी बाहेर जातात, जत तालुक्यातील महिलांच्या हातातील ऊस तोडीचा कोयता कायमचा हद्दपार करणे हे आमचे ध्येय आहे.
दरम्यान, जत येथे जत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असलेले आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्याच्या गटात असणारे राजेंद्र कोळेकर यांनी पडळकर यांची पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांना बिनशर्त पाठिंबा दिला.
पडळकर म्हणाले, निवडणूक लढवण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे उमेदवारी मागणं हे काही गैर नाही. आमची त्याबाबत काही तक्रारही नाही. पण एकदा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर तरी सर्वांनी पक्षासोबत यावं, पक्षाकडून त्यांचा योग्य सन्मान केला जाईल.
जत तालुक्यातील भाजपसह अन्य काही नेत्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक बोलावली. जत विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील भूमिपुत्राला उमेदवारी मिळावी व बाहेरील उमेदवार लादू नये अशी मागणी केली आहे.
Gopichand Padalkar Reveals His Two Biggest Enemy in Jat Constituency
महत्वाच्या बातम्या
-
Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
-
Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
-
Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी