विशेष प्रतिनिधी
मुंबई : मला धमकी देणारे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कोण आहेत? मी मुंबईत येणारच आहे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे तामीळनाडूतील नेते अनामलाई यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. Anamalai challenges Raj Thackeray
अनामलाई यांनी मुंबईबाबत बोलताना महाराष्ट्राचे शहर नाही असा उल्लेख केला होता. त्यावरून रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आता याच मुद्द्यावर अनामलाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अनामलाई म्हणाले, मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. ठाकरे बंधूनी फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलवली होती. मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं लिहिलं आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणारच आहे.
ते म्हणाले, मुंबई शहर हे केवळ महाराष्ट्रापुरते सिमीत नसून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याने महाराष्ट्रातील लोकांचे योगदान कुठेही नाकारलेले नाही, मलाही माहिती नव्हते की मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असं लिहिलं आहे की मी मुंबईत आलो तर माझे पाय छाटून टाकतील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येणार आहे.. माझे पाय छाटण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करून पाहा. धमक्यांना घाबरणारा असतो तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की कामराज हे भारताचे सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो का की ते तमिळ राहिले नाहीत? त्याचप्रमाणे मी जर म्हणतोय की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तर त्याचा अर्थ असा होतो का की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केलेली नाही?\” अशा शब्दांत अनामलाई यांनी राज यांच्या टीकेला उत्तर दिले.
अनामलाई मुंबईत काय म्हणाले होते?भाजपा नेते के. अनामलाई या मुलाखतीत म्हणाले होते, इथल्या लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे. जर तुम्ही चेन्नई पाहिले तिथे डिएमके आहे आणि टॉपला भाजपा , बंगळुरू काँग्रेस, भाजपा आणि हैदराबाद येथेही काँग्रेस भाजपा असं आहे. मात्र मुंबई हे देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी आहे ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट ८ हजार कोटी आहे. बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.
I am not afraid of threats, I will come to Mumbai, Anamalai challenges Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन