विशेष प्रतिनिधी
मुंबई: विलीनीकरणाबाबत कोणताही प्रस्ताव किंवा विचार समोर आला, तर त्यावर पक्षपातळीवर चर्चा होईल. मात्र, आम्ही एनडीएचा घटक पक्ष असल्याने कोणताही मोठा निर्णय घेताना भाजपला विश्वासात घेणे अनिवार्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. Sunil Tatkare
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवरून राजकारण तापले असताना पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, “जेव्हा एखादी चर्चा सुरू होईल, तेव्हा सुनेत्रा पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील. मात्र, आज एनडीएचा मुख्य पक्ष भाजप आहे. आम्ही २०२३ मध्ये जेव्हा एनडीएत सहभागी झालो, तेव्हा भाजपने आम्हाला अनुमती दिली होती. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या मोठ्या निर्णयावेळी आघाडीतील मुख्य पक्षाशी चर्चा करावीच लागेल.”
शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात दावा केला होता की, अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे नाटे षडयंत्र करून केलेले आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रीवादीतून बाहेर पडून, वेगळा गट स्थापन करावा लागला होता. याची आपल्याला कल्पना व जाणीव आहे. पण झालेली चूक पुन्हा दुरुस्त करायची, अशा विचाराने दादा मागील चार पाच महिन्यांपासून कामाला लागले होते. यावर संताप व्यक्त करत सुनील तटकरे म्हणाले, “शिंदेंनी केलेले विधान अत्यंत गैर आहे.
अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर अशा प्रकारचे लिखाण करणे अनाठायी आहे. दादांनी घेतलेले निर्णय हे स्वच्छ मनाने आणि पक्षाच्या हितासाठीच होते. आता असे लिहून ते नेमके काय साध्य करू पाहत आहेत? त्यांचा हेतू काय? हे मला कळू शकले नाही. यापुढे जर काय ते अशा आरोपांमुळे दादांनी हा निर्णय घेतला असं जर काही बोलत राहतील, तर योग्य पद्धतीने त्यांना उत्तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे देईल.
भाजपसोबत जाण्याची अजितदादांची भूमिका नवीन नव्हती,” असा पुनरुच्चार तटकरे यांनी केला. २०१४, २०१६ आणि २०१७ मध्येही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. २०१९ मध्येही दादांनी स्पष्टपणे सांगितले होते की, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार राज्याला स्थिरता देऊ शकते. त्यांनी आपली ही इच्छा कधीही लपवून ठेवली नव्हती, असेही सुनील तटकरे म्हणाले.
Merger Talks Cannot Move Without BJP’s Consent, Says Sunil Tatkare
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया