विशेष प्रतिनिधी
मुंबई : नगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गट अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचे पहिल्या काही बिळातून दिसत आहे.
श्रीवर्धनमध्ये खासदार सुनील तटकरे यांना धक्का
श्रीवर्धनमधये खासदार सुनील तटकरे यांना धक्का बसला आहे.. तेथे उध्दव ठाकरे सेनेचे अतुल चोगले विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे जितेंद्र सातनाक यांचा अनपेक्षित पराभव झाला आहे. श्रीवर्धन हा आदिती तटकरे यांचा विधानसभा मतदार संघ आहे.
शिरोळ नगरपरिषदेवर यादव आघाडीने सत्ता मिळवत नगराध्यक्ष पदासह तब्बल १५ नगरसेवक विजयी केले आहेत. या निकालामुळे आमदार अशोकराव माने यांच्या सुनबाईंचा दारुण पराभव झाला असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाची शिरोळवरील सत्ता पूर्णतः संपुष्टात आली आहे.
मुक्ताईनगर ( जि.जळगाव) नगराध्यक्षपद भाजप पिछाडीवर असून शिंदेसेनेने आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत ४१७९ पैकी शिवसेना शिंदे गटाच्या संजना पाटील २४६०, भाजपच्या ललिता महाजन १६५८, नोटा ५३ मते.
कामठी प्रभाग क्र 1 मध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शकुर नागाणी अंदाजे 1 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
भगूर नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता संपुष्टात आणली आहे. मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत विजयाचे खाते उघडले आणि एकूण सात उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्यातील विजयी नगराध्यक्षांची यादी:
1.चंदगड नगरपंचायत- सुनील कावनेकर (भाजप)
2. अनगर नगरपंचायत- प्राजक्ता पाटील (भाजप)
3. जामनेर नगरपरिषद- साधना महाजन (भाजप)
4. दोंडाईचा नगरपरिषद- नयनकुमार रावल (भाजप)
5. मेढा नगरपंचायत- रुपाली वारागडे (भाजप)
6. करमाळा नगरपरिषद- मोहिनी संजय सावंत (करमाळा शहर विकास आघाडी)
7. मलकापूर नगरपंचायत- रश्मी कोठावळे (जनसुराज्य शक्ती पक्ष)
8. हातकणंगले नगरपंचायत- अजितसिंह पाटील (शिवसेना शिंदे गट)
9. औसा नगरपरिषद- परवीन नवाबुद्दीन शेख (अजित पवार गट)
10. आटपाडी नगरपंचायत- यु.टी. जाधव (भाजप)
11. उरण नगरपरिषद- भावना घाणेकर (शरद पवार गट)
12. पन्हाळा नगरपरिषद- महेश भाडेकर (अपक्ष)
Municipal Polls Throw Up Major Upsets as Veteran Leaders Suffer Setbacks
महत्वाच्या बातम्या
- Sonia Gandhi : मनरेगावर मोदी सरकारचा बुलडोजर, सोनिया गांधी यांची टीका
- धर्माबाद शहरात तणाव, शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
- पुण्यात भाजपचा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसह ठाकरे गटाला धक्का; अनेक माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश
- Vijay Vadettiwar : विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली, निवडणूक आयोगाला म्हणाले नालायक