विशेष प्रतिनिधी
मुंबई : ओबीसी समाजाचे हक्क संपवण्याचा प्रयत्न सुरू असून शासन त्याला खतपाणी घालत आहेः. तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलं आहे, असा संताप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला.
मुंबईत झालेल्या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली होती. समितीच्या स्थापनेपासून आतापर्यंत राज्यात 48 लाख कुणबी नोंदी आढळल्याचे त्यांनी सांगितले. या नोंदींच्या आधारे सुमारे 12 लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. Laxman Hake
या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला उद्देशून बोलताना त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांनी म्हटले की, विखे पाटील सारख्या मुजोर मंत्र्याने ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारच्या धोरणांमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हाके म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याचा इशारा देत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी महाराष्ट्राला सांगत आहे की ओबीसी आरक्षण संपत चालले आहे. बलुतेदार आणि अलुतेदार समाजाचे सामाजिक न्यायाचे हक्क कमी होत आहेत, असे ते म्हणाले. राज्यात 48 लाख कुणबी नोंदी सापडल्याचे सांगितले जाते आणि 12 लाख प्रमाणपत्रे वितरित झाल्याचेही जाहीर केले जाते. यानंतर पुन्हा शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात येत आहे. याचिकांवर न्यायालयीन लढाई सुरू असताना सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
हाके यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. फक्त न्यायालयात जाणे पुरेसे ठरणार नाही. आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून ओबीसी कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्यावर हल्ले केले जात आहेत, शिवीगाळ केली जाते आणि आमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील ओबीसी समाजाने आता जागे होण्याची वेळ आली असल्याचेही हाके यांनी ठामपणे सांगितले. ओबीसी हा आमचा डीएनए आहे असे सत्ताधारी सांगतात; पण प्रत्यक्षात मात्र शांतपणे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचे महापाप सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. जर समाजाने वेळीच आवाज उठवला नाही, तर भविष्यात आरक्षण परत मिळवणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे मराठा-कुणबी नोंदी, आरक्षण आणि ओबीसी हक्क यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
“OBCs, Keep Sleeping… Your Reservation Is Gone,” Laxman Hake Says in Anger
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!