निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार, सुजात आंबेडकर यांचा साेलापुरात दावा

विशेष प्रतिनिधी

साेलापूर : महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असून, प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. Praniti Shinde

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूरात झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. सुजात आंबेडकर म्हणाले, आपल्या विरोधात एकीकडे भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात. हे सर्वांनाच माहीत आहे. या निवडणुकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या.



मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले की, “थांबा, तीन महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत . नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका. या निवडणुका होईपर्यंत तुम्ही काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. त्यानंतर प्रणितीताई काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी प्रणिती ताई आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झालेली आहे.

आंबेडकर म्हणाले.”जर तुम्हाला भाजपला सत्तेतून दूर करायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे. यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. दोन ते तीन महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफ यांच्या लग्नात शरद पवार, गौतम अदाणी आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते प्रमुख पाहुणे होते. हे भाजप आणि काँग्रेस समोरासमोर ईव्हीएमवर आणि रस्त्यावर लढत असल्याचे नाटक करतात.

पण यांचे बिझनेस एक, यांची लग्ने एक, यांची नातीगोती एक, यांचे धंदे एक आणि प्रणिती ताईंनी प्रवेश घेतला की यांचा पक्षसुद्धा एकच असेल. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका. तुम्ही काँग्रेसला मत दिले, म्हणजेच भाजपला मत दिल्यासारखेच होईल. हे मी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल बोलत नाही, तर सोलापूरबद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार भाजपसाठी काम करतात, हे अख्ख्या जगाला कळून चुकले आहे.

Praniti Shinde To Join BJP After Elections,” Claims Sujat Ambedkar In Solapur

महत्वाच्या बातम्या