विशेष प्रतिनिधी
पुणे : मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवशी गुरुवारी जिल्ह्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तरीही काही खासगी कंपन्या, कारखाने व आस्थापने यांनी कामकाज सुरू ठेवल्याचे आढळून आल्यास संबंधित नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कामगार उपायुक्त कार्यालयाने दिला आहे.
मतदानाच्या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह खासगी आस्थापनांनाही सुटी लागू राहणार आहे. औद्योगिक आस्थापना, आयटी कंपन्या, निवासी हाॅटेल्स, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर्स, कारखाने आदी ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास तेथे दोन ते तीन तासांची सवलत द्यावी.
कोणतीही कंपनी किंवा आस्थापना मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुटी न देता कामावर बोलावत असल्याचे आढळल्यास, संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी अपर कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन कामगार उपायुक्त निखिल वाळके यांनी केले आहे.
Public holiday in the district on Thursday, polling day, legal action against violators
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन