विशेष प्रतिनिधी
मालेगाव : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना बेलगाम वक्तव्यांबद्दल मंत्री दादा भुसे यांची माफी मागावी लागली. दादा भुसे यांनी मोठ्या मनाने माफ केल्यामुळे संजय राऊत यांचा खटला न्यायालयाने निकाली काढला. Sanjay Raut
न्यायालयात आणि माध्यमांसमोर राऊत यांनी स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी मान्य केले. आम्हा दोघांना न्यायालयाने पहिले, विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. मालेगावच्या शेतकऱ्यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रुनुकसानीचा दावा मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मालेगावच्या शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा संभ्रम, तसेच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता संपला आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले.
178 कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याशी संबंधित संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. संजय राऊत यांनीही दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हणत विषयाला मैत्रीपूर्ण विराम दिला.
दादा भुसे यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवून हा वाद निर्माण केला. ज्यांच्याकडून माहिती आली तेही आता दुसऱ्या पक्षात गेले असल्याचे सूचक विधान करण्यात आले. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. मात्र राऊत यांनी स्वतः आरोप मागे घेतल्याने आणि खोटेपणा मान्य केल्याने पुढील कारवाईची गरज उरली नसल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
Sanjay Raut Apologises; Dada Bhuse Accepts and Forgives
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी