विशेष प्रतिनिधी
पुणे: शरद पवार यांची प्रकृती सध्या उत्तम आहे. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.
पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. Sharad Pawar
रुग्णालयाचे चेअरमन आणि मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांची तब्येत स्थिर आणि समाधानकारक असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या टीमने पुढील काही दिवस त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. शरीराला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे तत्काळ व्यस्त दिनक्रम सुरू करण्याऐवजी नियोजनबद्ध पद्धतीने पुढील कामकाज सुरू करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवार हळूहळू आपल्या नियमित कामकाजाकडे वळतील आणि सार्वजनिक कार्यक्रमांनाही उपस्थित राहतील, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत असल्याने समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शरद पवारांना छातीत संसर्ग झाला होता त्यामुळे त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. त्यांच्या ऑक्सिजनची पातळी आणि इतर जीवनावश्यक निकष सामान्य मर्यादेत असल्याचेही सांगण्यात आले होते. रुग्णालयातील खासगी खोलीत डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात होते. ते डॉक्टरांशी संवाद साधत होते तसेच भेटायला येणाऱ्यांशीही बोलत होते.
Sharad Pawar Stable, Likely To Be Discharged Today
महत्वाच्या बातम्या
- व्हीएसआर विमान कंपनीवर अद्याप कारवाई का नाही? राेहित पवार यांचा सवाल
- Shashikant Shinde : विलीनीकरणानंतर अजित पवार करणार हाेते राष्ट्रवादीचे नेतृत्व, शशिकांत शिंदे यांचा दावा
- “तटकरे, पटेल व्हिलन कसे?” हसन मुश्रीफांचा रोहित पवारांना सवाल
- संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन”; एसीबी छाप्यानंतर मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया