विशेष प्रतिनिधी
नाशिक : Uddhav Thackeray भाजपचे हिंदुत्व चुनावी आहे. प्रभू श्रीरामाने ज्या रावणाचा वध केला, त्या रावणाला सुद्धा पक्षात घ्यायला भाजप बसली आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.Uddhav Thackeray
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावर उभय नेत्यांची संयुक्त सभा पार पडली.Uddhav Thackeray
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, भाजपने पाठीत वार केला म्हणून मी कॉंग्रेससोबत गेलो होतो. माझ्यावर टीका केली की मी हिंदुत्व सोडले. यांनी आकोटमध्ये काय केले? तेव्हा काय सुटले नाही का? अंबरनाथमध्ये कॉंग्रेससोबत युती केली. भ्रष्टाचार इतुका मेळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आणि यांच्यात जे आता लागले आहे, मुंबईच्या लोकसत्तेत एक बातमी आली आहे. गणेश नाईक पहिले आपलेच आता गद्दार. एकनाथ शिंदे पहिले आपलेच, आता गद्दार. आता त्या दोघांमध्येच लागली आहे. हीच लोक सांगतात की कशी अभद्र युती आहे त्यांची. तुमच्या व्यथा कोण मांडत आहे?Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपवाले सुद्धा बघत असतील चोरून. मला त्यांना विचारायचे आहे, काय नशिबी आले जीवन. सलीम कुत्ता चालतो, ही असली माणसं पक्षात घ्यायची. हा भाजप तुम्हाला अपेक्षित होता? आम्ही एकत्र आल्यावर ज्यांनी फटाके वाजवले ते दुसऱ्या दिवशी तिकडे. हा पक्ष उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. भाजप हा दलालांचा पक्ष झाला आहे. तिकडे मुनगंटीवार म्हणाले, शनिशिंगणापुर आणि भाजपला दरवाजेच नाहीत. पण जे पक्षात येत आहेत, ते ईडी, सीबीआयग्रस्त येत आहेत. त्या रावणाला सुद्धा उद्या पक्षात घ्यायला बसलेत हे.
उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्टाइलमध्ये भाषणाची सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले, आज माझा भाऊ माझ्या सोबत आहे. या जनतेच्या व्यथा काय आहेत? हे लक्षात घ्या, असे उमेदवारांना उद्देशून ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, नागरिकांसाठी काम करणारे दोन भाऊ एकत्र आले तर काय होईल, हे तुम्ही बघा. या शहराचे समस्या त्याच आहेत, ज्या इतर ठिकाणी आहेत. महाराष्ट्रात कुठल्याही शहरात गेलात, समस्या त्याच. या 10 वर्षात त्यांनी केले आहे. आमच्या मुलाखती सुरू आहेत रोज. मुलाखतकार रोज एक प्रश्न विचारतात, तुम्ह दोघं भाऊ एकत्र आलात, मी म्हणलं तुमच्या पोटात का गोळा आला? आमच्या अस्तित्वाची चिंता तुम्ही करू नका. शिवसेनेला आता 60 वर्ष होतील. अनेक पराभव बघितले तरी ही शिवसेना संपली नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या मुलांचे भवितव्य काय असणार आहे, त्याचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. भाजपचे हिंदुत्व चुनावी हिंदुत्व आहे. जिथे प्रभू रामचंद्र वास्तव्यास होते, ते तपोवणातील वृक्ष तोंडली जात आहेत. संपूर्ण सत्यानाश केला आहे. धर्माची अशी पट्टी लावली आहे की सगळे अंधभक्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतले होते. ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, त्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात, असा टोला त्यांनी लगावला. म्हणून मोहन भागवत म्हणतात पोरं वाढवा.
“They’re Ready to Induct Even Ravana,” Uddhav Thackeray Launches Sharp Attack on BJP
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाने बोलावली बैठक, मतदानाची तारीख निश्चित होणार
- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करा, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
- शिंदे गटाकडून १५० ठिकाणी एबी फॉर्म, पुण्यात भाजप–शिवसेना युती तुटल्याचे स्पष्ट संकेत
- संभाजीराजांबद्दल बदनामीकारक लिखाण झाले असेल तर सुधारेन, विश्वास पाटील यांचे आश्वासन