विशेष प्रतिनिधी
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुरज्य पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी वाट पकडली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र जनसुराज्यकडून संताजी घोरपडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.
महायुतीमध्ये जनसुराज्य पक्ष सहयोगी पक्ष असतानाही संताजी घोरपडे यांची उमेदवारी अजूनही कायम असल्याने विनय कोरे यांच्या मनात आहे तरी काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे जनसुराज्यकडून हातकणंगलेमध्ये अशोकराव माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यांना शिंदे गटाकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला आहे. असे असतानाही करवीरमध्ये शिंदेविरोधातील उमेदवार अजूनही कायम आहे. ही भूमिका चर्चेत असताना चंदगडमध्येही जनसुराज्यकडून मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिल्याने आणखी चर्चेत भर पडली आहे. त्यामुळे मानसिंग खोराटे आणि संताजी घोरपडे यांची उमेदवारी कायम राहणार का? याची उत्सुकता आहे.
Vinay Kore of Jan Surajya Party nominated candidate in Kolhapur District
महत्वाच्या बातम्या
- Shiv Sena UBT : शिवसेना ‘UBT’ने जाहीर केली आणखी एक उमेदवार यादी !Ajit Pawar : अजित पवारांना माेठा धक्का, दाेन विद्यमान आमदारांनी घेतली शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी
- Ajit Pawar : घरी बोलावता , जेऊ घालता आणि अदृश्य हात तुतारीसाठी वापरता? अजित पवारांचे हर्षवर्धन पाटील यांच्यावर जाहीर टीका
- Congress काॅंग्रेसची २३ जणांची यादी जाहीर, लहू कानडे यांना नाकारली उमेदवारी