डिझेल दरवाढीचा फटका लालपरीला; एसटी तिकीट दरवाढीचे संकेत

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: जगात सुरू असलेल्या युद्धाचा फटका अनेक देशांना विविध स्वरूपात बसलेला पाहायला मिळत आहे. सीएनजी, सोने आणि चांदी तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दरवाढ झाली आहे.मात्र डिझेल दरवाढीचा फटका आता लालपरीला देखील बसणार असल्याचे बोलले जात आहे, एसटीच्या तिकिटात दरवाढ होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिकीट दरवाढीबद्दल निर्णय लवकरच घेतला जाईल असे स्पष्ट केले आहे.



प्रताप सरनाईक  म्हणाले की, ‘ एसटीला १० लाख 87 हजार डिझेल लागत. सध्या इंडियन ऑइलकडून डिझेल पुरवठा होत आहे.मागील आठवड्यात डिझेलच्या दरात ३ रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे 33 लाख 70 हजार रुपये आम्हाला जास्तीचे मोजावे लागत आहेत. यामुळे महामंडळाचा वर्षाला तब्बल 124 कोटी रुपयांचा तोटा होत आहे. जागतिक पातळीवर युद्ध अधिक तीव्र स्वरूपाचे झाल्यास अजून परिणाम होईल. पंतप्रधानांनी आवाहन केले आहे, मात्र भविष्यात काय होईल सांगता येत नाही.विशेष सवलत देण्याचा निर्णय झाल्यास,आम्ही दरवाढ करणार नाही.कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे.पुढील १० ते १२ दिवस केंद्र आणि राज्य सरकारनं पुर्तता केली तर दरवाढ करणार नाही, मात्र पुर्तता न झाल्यास दरवाढ करावी लागेल, ऑईल कंपनीने पूर्व किंमतीत दिलं तर दरवाढ करणार नाही. इंधनवाढ झाली तर आम्हाला दरवाढ करावी लागेल ‘. अस सरनाईक यांनी स्पष्ट केले.

अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई..

बाईट टॅक्सीबाबत मी सायबर पोलिसांना पत्र देऊन अनधिकृत रित्या चालू आहेत. काही ठिकाणी महिलांबरोबर गैरप्रकार घडले होते. अनेक नियम पायदळी तुडवल्या जात होत्या. कंपन्यांनी नियम पायदळी तुडवले त्यामुळे ही भूमिका घेतली. १५ तारखेला गुगलला पत्र दिलं त्यानंतर त्यांनी ओला उबेरच्या सरसकट गाड्यांवर बंदी घातली. त्यामुळे तो घोळ झाला, त्यात फक्त अनधिकृत बाईक टॅक्सीवर कारवाई केली जाईल, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

Diesel price hike hits Lalpari; ST ticket price hike hints

महत्वाच्या बातम्या