Ajit Pawar अजित पवार विमान अपघाताची हाेणार सीआयडी चाैकशी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. राज्य सरकारने या दुर्घटनेची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीआयडी) चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Ajit Pawar

बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
फॉरेन्सिक पथकाने याआधीच अपघातस्थळी भेट देऊन आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. हा संपूर्ण तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. सीआयडी तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. Ajit Pawar



सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, हे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले होते. त्या वेळी वैमानिकांना सांगण्यात आले की हवामान सामान्य आहे, वाऱ्याचा वेग कमी आहे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर इतकी आहे. यानंतर वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला कळवले होते.

थोड्या वेळाने पायलटने पुन्हा एटीसीला कळवले की रनवे दिसू लागल्यावर ते माहिती देतील. त्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे एटीसीकडून कळवण्यात आले. मात्र, यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या दृश्याने नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती.

या अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत नेमके काय घडले, याचा उलगडा CID चौकशीतून होण्याची शक्यता आहे. वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती आणि एटीसीशी झालेला संवाद या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या मृत्यूमुळे हा तपास अत्यंत संवेदनशील मानला जात असून, कोणतीही शक्यता गृहित धरून चौकशी केली जाणार आहे.

Ajit Pawar plane crash to be investigated by CID

महत्वाच्या बातम्या