विशेष प्रतिनिधी
पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपाच्या नगरसेवकांना पक्षातील मतभेद बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्याचे संदेश वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे.” पक्षात आता आतला- बाहेरचा वाद नको, मतभेद नकोत.ज्या भागात पक्षाची ताकद कमी आहे,तिथे इतर पक्षातील कार्यकर्ते आणि नेत्यांना सोबत घेऊन भाजपाची ताकद वाढवावी ” असा सल्ला भाजपा नगरसेवकांना देण्यात आला आहे.
नारायणपूर येथे आयोजित दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात भाजपाच्या नगरसेवक, आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये अधिक समन्वय निर्माण करण्यावर या शिबिरात विशेष भर देण्यात आला.यावेळी पक्षवाढ, संघटनात्मक शिस्त आणि आगामी निवडणुकांची रणनीती यावर चर्चा करण्यात आली.
वरिष्ठ नेत्यांकडून काय संदेश देण्यात आला?
वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, राष्ट्रहिताबरोबरच पक्षाच्या विचारधारावर ठाम राहणे आवश्यक आहे. पक्ष वाढीसाठी वैयक्तिक मतभेद आणि कटबाजी बाजूला ठेवली पाहिजे. नगर विकास, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या कामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सूचना यावेळी वरिष्ठांकडून देण्यात आले. भाजपच्या ध्येय धोरणानुसार नागरिकांशी थेट संपर्क वाढवून संघटन मजबूत करण्याचा मंत्र नगरसेवकांना यावेळी देण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये अंतर्गत नाराजीला उधाण आले आहे.त्यातच वरिष्ठांकडून नगरसेवकांना देण्यात आलेला कानमंत्र राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
BJP on alert mode ahead of local body elections; Message of unity to corporators
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश