प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडीमध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी, प्रभाग क्र 36 आबा बागुल यांचा पराभव

विशेष प्रतिनिधी

पुणे: प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडीमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवत चारही जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे सनी निम्हण, परशुराम वाडेकर, सपना चाजेड आणि भक्ती अजित गायकवाड हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीतील अत्यंत चुरशीचा मानला जात होता. भाजपने माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांना उमेदवारी नाकारून माजी आमदार दिवंगत विनायक निम्हण यांचे पुत्र सनी निम्हण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष लागले होते.

भाजपच्या माजी नगरसेविका अर्चना मुसळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजपच्या भक्ती अजित गायकवाड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
या निकालामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपचे वर्चस्व स्पष्ट झाले असून, अंतर्गत नाराजी आणि पक्षांतराच्या पार्श्वभूमीवरही भाजपने येथे एकतर्फी विजय मिळवला असल्याचे चित्र आहे.

पुणे महापालिकेच्या सहकारनगर पद्मावती प्रभाग क्र 36 भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार विजयी झाले. भाजपच्या वीणा घोष शैलजा अरुण भोसले, सई थोपटे आणि महेश वाबळे यांनी विजय मिळवला.
या प्रभागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल शिवसेना शिंदे गटातून लढत होते. त्याचा पराभव झाला.

BJP Sweeps Ward No. 8 Aundh–Bopodi, All Four Candidates Elected

महत्वाच्या बातम्या