विशेष प्रतिनिधी
पुणे : Hardik Pandya भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या याच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टी २० वर्ल्ड कप अंतिम सामन्यानंतर तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप करत एका वकिलाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अर्ज दिला आहे.Hardik Pandya
ॲड. वाजेद खान यांनी केलेल्या तक्रारीनुसार, टी २० वर्ल्ड कप विजयाचा आनंद साजरा करताना हार्दिक पांड्याने तिरंगा परिधान करून अश्लील चाळे केले. त्यावेळी त्याने भारतीय ध्वज गुंडाळलेला होता. या कृतीमुळे राष्ट्रीय ध्वजाचा अपमान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.Hardik Pandya
या प्रकरणात राष्ट्रीय गौरव अवमान अधिनियमांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार अर्जासोबत संबंधित व्हिडिओही जोडण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिसांकडून या तक्रारीची पडताळणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Complaint Filed Against Hardik Pandya in Pune for Alleged Insult to National Flag
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका शहरातील वसतिगृहांपर्यंत; गॅस टंचाईमुळे चुलीवर स्वयंपाक
- गोकुळ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; 1200 सभासदांच्या पात्रतेवर सुनावणी
- एलपीजी गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन
- महाराष्ट्र वेगळे राष्ट्र असते तर जगाच्या अर्थव्यवस्थांमध्ये 30 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन