विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.ते 82 वर्षांचे होते. Suresh Kalmadi
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनसाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर कलमाडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी हे केंद्रीय मंत्री होते. पुण्याच्या राजकारणात सुरेश कलमाडी यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. पुण्याच्या राजकारणात कलमाडी यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्यामुळे एक सुरेश कलमाडी अनेक वर्षे पुण्याचे खासदार राहिले. Suresh Kalmadi
राष्ट्रकुल घोटाळ्याच्या आरोपांमुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली होती आणि राजकारणात त्यांचा उतरणीचा काळ सुरु झाला. राष्ट्रकुल क्रीडा घोटाळ्यात काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते, ज्यात आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून आर्थिक गैरव्यवहारांचा समावेश होता. Suresh Kalmadi
अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर, एप्रिल 2025 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) या प्रकरणी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. मात्र, त्यानंतर सुरेश कलमाडी हे पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होऊ शकले नाहीत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते.
सुरेश शामराव कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी झाला. ते भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले. ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा खासदार राहिले होते. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती.
Former Pune MP Suresh Kalmadi Passes Away
महत्वाच्या बातम्या
- सत्ताधाऱ्यांनी पैशांचा गैरवापर केला; बिनविरोध निवडीविरोधात मनसेची आयोगाकडे तक्रार, हायकोर्टात याचिका
- Harshvardhan Sapkal : महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- Owaisi : लव्ह जिहाद’ची नेमकी व्याख्या स्पष्ट करा : ओवेसी यांचे भाजप आणि आरएसएसला आव्हान
- CM Fadnavis : तुम्हाला जेलमध्ये कोणी टाकलं?’ मुख्यमंत्री फडणवीसांचा राज ठाकरेंना थेट सवाल