विशेष प्रतिनिधी
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक यश मिळालं असून, त्यांच्या पक्षाचे एकूण ११९ नगरसेवक निवडून आले.
या सर्व नगरसेवकांची दोन दिवसांपूर्वी बैठक पार पडली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे एकमताने भाजपाला मान्यता दिली.
बैठकीत प्रभाग क्र. २४-ड मधून निवडून आलेले गणेश मधुकर बिडकर यांची पुणे महानगरपालिकेच्या भाजपा गटनेतेपदी निवड करण्यात आली.Ganesh Bidkar
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतेच भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्राद्वारे पुणे महानगरपालिकेच्या गटनेता पदासाठी गणेश बिडकर यांचे नाव निश्चित करावे असे सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या निकालाआधीच गणेश बिडकर महापौर होणार असे बॅनर झळकले होते,मात्र गणेश बिडकर यांना दुसऱ्यांदा सभागृह नेते पदाची संधी मिळालेली आहे.Ganesh Bidkar
गणेश बिडकर हे 9 हजार 234 मतांनी विजयी झाले होते. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा त्यांनी पराभव केला होता.
Ganesh Bidkar elected as BJP Group Leader in Pune Municipal Corporation.
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : यूजीसीच्या वादग्रस्त नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
- दादा, तुम्ही आमच्यात नाहीत हे मन मान्यच करायला तयार नाही, प्रताप सरनाईक यांचे हृदयस्पर्शी पत्र
- सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची नरहरी झिरवळ मागणी
- दारू आणि नियमभंग, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमागे वैमानिकाचा धक्कादायक भूतकाळ