US–Israel–Iran : अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा फटका; पुण्यात गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद

विशेष प्रतिनिधी

पुणे : US–Israel–Iran  आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा परिणाम आता पुणे शहरावरही दिसू लागला आहे. गॅसच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे पुणे महानगरपालिकेच्या गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या तात्पुरत्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.US–Israel–Iran

भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार देशात उपलब्ध असलेल्या प्रोपेन आणि ब्यूटेन या घटकांचा वापर प्रामुख्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गॅसच्या उपलब्धतेवर ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम म्हणून पुणे शहरातील गॅस आधारित दाहिन्या ५ मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.US–Israel–Iran



नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्था केली असून विद्युत दाहिन्या तसेच एअर पॉल्युशन कंट्रोल (एपीसी) प्रणालीवर आधारित दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, वैकुंठ स्मशानभूमी येथे कार्यरत असलेल्या तीन गॅस दाहिन्याही तात्पुरत्या बंद राहतील. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी तेथील पाच विद्युत दाहिन्या सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने दिली आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी परिस्थितीची नोंद घेऊन महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Impact of US–Israel–Iran Conflict: Gas Crematoriums Temporarily Shut in Pune

महत्वाच्या बातम्या