Eknath Khadse : भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे व पत्नीविरोधात अटक वॉरंट, हजर न राहिल्याने विशेष न्यायालय नाराज, सूट अर्ज फेटाळला

विशेष प्रतिनिधी

पुणे : भोसरी औद्योगिक वसाहतीतील वादग्रस्त जमीन व्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी केले आहे.



या प्रकरणात आरोप ठरवण्याची सुनावणी निश्चित असताना खडसे दाम्पत्य वारंवार गैरहजर राहत असल्याने न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. विशेष न्यायाधीश महेश जाधव यांनी खडसेंच्या वकिलांनी दाखल केलेला सूट अर्ज अस्पष्ट आणि कोणतेही ठोस कारण नसल्याचे सांगत फेटाळून लावला.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की, आरोप ठरवण्याच्या टप्प्यावर आरोपींची उपस्थिती बंधनकारक असते. “आजची सुनावणी आरोप ठरवण्यासाठी असल्याची पूर्ण जाणीव असूनही आरोपी कोणत्याही वैध कारणाविना अनुपस्थित राहिले,” अशी निरीक्षणे नोंदवत न्यायालयाने वॉरंट बजावले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 12 फेब्रुवारी रोजी ठेवली.
याचवेळी न्यायालयाने हेही निदर्शनास आणले की, या प्रकरणाशी संबंधित एका अन्य गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) देखील खडसे यांच्याविरोधात नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले आहे.
हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) तपासले जात असून, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेल्या एफआयआरवर आधारित आहे. तपास यंत्रणांच्या मते, 2016 मध्ये महसूल मंत्री असताना खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुण्यातील भोसरी येथील सुमारे 3 एकर जमीन पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावावर खरेदी करण्यास मदत केली.
सदर जमीन ₹3.75 कोटींना खरेदी करण्यात आली, मात्र तिची बाजारभावानुसार किंमत ₹31.01 कोटी असल्याचा आरोप आहे. यामुळे भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराचे गंभीर आरोप उभे राहिले आहेत.
गेल्या डिसेंबरमध्ये याच न्यायालयाने खडसे यांचा डिस्चार्ज अर्ज फेटाळताना, नोंदीवरील पुरावे प्रथमदर्शनी बेकायदेशीर व अप्रामाणिक मार्गाने मालमत्ता मिळविल्याचे दर्शवतात, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने खडसे यांच्या हेतूबाबत कठोर टिप्पणी करत संपूर्ण खटला चालवण्यास पुरेसे आधार असल्याचे नमूद केले होते.
राजकीय पडसाद कायम
2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमध्ये प्रभावी नेते म्हणून ओळख असलेले एकनाथ खडसे, जमीन व्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर 2016 मध्ये मंत्रिपदाला मुकले.

NBW Issued Against Eknath Khadse and Wife in Bhosari Land Deal Case; Special Court Rejects Exemption Plea Over Absence

महत्वाच्या बातम्या