Bapu Nair : कुख्यात गुन्हेगार बापू नायर याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Bapu Nair  कुख्यात गुन्हेगार बापू नायर याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून महापालिकेसाठी तिकीट देण्यात आले असून त्याने आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नायरला उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.Bapu Nair

कुमार ऊर्फ बापू प्रभाकर नायर असे त्याचे पूर्ण नाव आहे. नायर याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे, खंडणी आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2020 साली युवा सेना पदाधिकारी दीपक मारटकर यांची हत्या झाली होती. त्या गुन्ह्यात देखील नायरला अटक झाली होती. मागील वर्षी जमीन बळकावल्याच्या गुन्ह्यात लागलेल्या मोक्क्यात त्याला जामीन मिळाला होता.Bapu Nair



त्यानंतर, बापू नायरने राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी चाचपणी सुरु केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नायरला उमेदवारी देत सर्वांनाच धक्का दिला आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे, बंडू आंदेकरच्या जवळच्या नातेवाईक लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांनाही उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारींमुळे राष्ट्रवादीवर टीका देखील होऊ लागली आहे.

Notorious Criminal Bapu Nair Gets NCP Ticket

महत्वाच्या बातम्या