मांजरी बुद्रुक-केशवनगरच्या विकासासाठी शिवसेनेची साद

विशेष प्रतिनिधी

पुणे : लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाईच्या स्वप्नातील प्रभाग निर्मितीसाठी सुरू असलेली धडपड निश्चितपणे यशस्वी होईल. त्यासाठी मतदारांनी प्रभागाच्या सुनियोजित विकासाची संधी आम्हाला द्यावी, असे आवाहन प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर यांनी केले आहे.

प्रभाग १५ मांजरी बुद्रक केशवनगर साडेसतरानळी शेवाळवाडीमधील येथील शिवसेनेचे उमेदवार संदीप लोणकर यांनी केशवनगर परिसरातील वाय जंक्शन, रेणुका माता मंदिर परिसर, लोणकर वस्ती व सोसायट्यांमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी त्यांचे औक्षण केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांनी या नवनिर्मित प्रभागाच्या विकासाची संधी देण्याचे आवाहन शिवसेना उमेदवारांनी केले. यावेळी काढलेल्या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, निळकंठ अण्णा, तेजस गायकवाड, राऊत साहेब, शैलेंद्र शेलार, चेतन जाधव, आरिफ पटेल, शंतनू सरकार, बोबडे, विशाल सूर्यवंशी, विजय कदम, श्रीधर अडकुटे, तुषार मरळ, निकिता गायकवाड, गौरीशंकर घुले, सुमीत साहिल भंडारी, ओम कांबळे, जयराम राजपूत, प्रशांत भंडारी, ज्योती गागडे, कांता हाके, मंगला शिनलकर आदी सहभागी झाले होते.

Shiv Sena’s call for the development of Manjari Budruk-Keshavnagar : Sandeep Lonkar

महत्वाच्या बातम्या