विशेष प्रतिनिधी
पुणे: वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत नायर आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला.
सकाळी दहाच्या सुमारास पुलावरून जात असताना आशिष कुमार यादव यांना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली,चौकशी केल्यावर नाल्यात पडलेली चारचाकी पडल्याचे कळले. वाहनात हालचाल होत असल्याचे जाणवताच आत कोणी अडकले असावे, असा संशय आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नाल्यात उतरून पाहणी केली. कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसली.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांनी गाडीची काच फोडून त्या जखमी चालकाला बाहेर काढले. त्या वेळी त्याच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीने रुमालाने नाकावर दाब देऊन रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नाल्याबाहेर काढले. गाडीत एक ते दीड लाख रुपये होते. चालक शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याजवळ असलेली रोख रक्कमही त्यांनी प्रामाणिकपणे परत दिली. यानंतर टेम्पोच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वानवडी बाजार पोलिस चौकीचे पीएसआय बाळासाहेब वाकडे यांनी सांगितले की, जखमी चालकाला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू आहे. वेग, रस्त्याची स्थिती किंवा पुलावरील संरक्षक कठड्यांची अवस्था याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. काही काळ त्या भागातील एक तास वाहतुकीवर परिणाम झाला होता.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आशिष कुमार यादव यांच्या धाडसी आणि माणुसकीपूर्ण कृतीचे विशेष कौतुक केले आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठी दुर्घटना टळली असून हा प्रसंग समाजात मानवतेचा आणि धैर्याचा आदर्श ठरत आहे.
The car fell into the canal from the bridge in Wanwadi; the driver’s life was saved due to the bravery of the military officer!
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक