विशेष प्रतिनिधी
पुणे:आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे.’ पुणे ग्रँड टूर 2027 ‘ सीझन 2027 मधील 26 ते 31 जानेवारी या कालावधीत पुण्यात पुन्हा रंगणार आहे.प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.स्पर्धेचा अंतिम टप्पा रविवारी ठेवण्यात आल्याने नागरिकांसाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आढावा बैठकीत यासंदर्भात माहिती दिली.या बैठकीत वाहतूक नियोजन,सुरक्षा व्यवस्था स्पर्धेचा मार्ग निश्चिती आणि महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली.
पुणेकरांना अडचणीचा सामना करावा लागू नये,म्हणून सुट्टीच्या दिवशी प्रारंभ आणि समारोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक या स्पर्धेचा आनंद घेतील आणि वाहतुकीवरील ताणही कमी राहील असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
एकूण 6 टप्पे कसे आहेत?
पहिला टप्पा: मोशी ते हिंजवडी – 26 जानेवारी
दुसरा टप्पा: बारामती ते सासवड – 27 जानेवारी
तिसरा टप्पा: जुन्नर ते राजगुरूनगर – 28 जानेवारी
चौथा टप्पा: आळंदी ते लोणावळा – 29 जानेवारी
पाचवा टप्पा: लोणावळा ते हिंजवडी – 30 जानेवारी
सहावा टप्पा: पीएमसी ते बालगंधर्व रंगमंदिर – 31 जानेवारी
या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पुन्हा एकदा ‘पुणे ग्रँड टूरचा’ आनंद घेता येणार आहे.
वाहतूक सुरक्षेवर भर
स्पर्धेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग,ट्रॅफिक दिवार्जनं आणि वेळेचे व्यवस्थित नियोजन यावर प्रशासनाकडून भर देण्यात आला आहे.
पुणेकरांसाठी ‘ फेस्टिवल ऑफ सायकलिंग’ ‘ पुणे ग्रँड टूर – 2027 ‘ पुन्हा एकदा उत्साहाची ठरणार आहे.
“Pune Grand Tour” is back in full swing! When will the thrills return to Pune?
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर