विशेष प्रतिनिधी
नाशिक : Manoj Jarange राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. वेगवेगळ्या आघाड्या झाल्या आहेत. त्यामध्ये आता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अप्रत्यक्षपणे उडी घेतली आहे. समाजासाठी काम करणाऱ्यांना सहकार्य करा असे त्यांनी म्हटले आहे.Manoj Jarange
जरांगे पाटील यावेळी म्हणाले, समाजासाठी राजकारण लोकांनी केले पाहिजे. आमचा चांगला सहकारी आहे. त्यांना चांगला पाठींबा द्या. समाजात चांगले काम करणारे टिकले पाहिजेत. समाजाने देखील त्यांना राजकारणात सहकार्य केले पाहिजे. माझ्या हातात मते नाही पण समाजाला मी आवाहन करू शकतो. आजचे व्यासपीठ राजकिय नव्हते. पण मी जे बोलायचे होते ते बोललो आहे.काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी नेहमी उभा राहतो, असे जरांगे यांनी यावेळी सांगितले.Manoj Jarange
मनोज जरांगे म्हणाले, समाजातील काम करणाऱ्या पोरांना सांभाळले पाहिजे, समाजाची लढाई लावून धरणाऱ्यांचा समाजाने सांभाळ केला पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर रडत बसण्यापेक्षा लढले पाहिजे. ज्यावेळी या राजकीय पटलावर समाजाचे पोरे उभे राहत असतील तर बळ दिले पाहिजे. मत माझ्या हातात नाही. पण समाजाला चांगला संदेश देतो आपल्या मुलांना बळ द्या मग क्षेत्र कोणते पण असेल.
भाजपाच्या ट्रोलिंगनंतर माघार घेणाऱ्या भाजपा उमेदवार पूजा मोरे यांच्याविषयी विचारले असता मनोज जरांगे म्हणाले, मला आत्ताच समजले, माहिती नव्हते. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर मग हे योग्य नाही. परतू त्यांच्या प्रकरणी माहिती अगोदर वक्तव्य करणे योग्य होणार नाही. तुमच्या माध्यमातून समजत आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारे जुने व्हिडिओ काढून ट्रोलिंग होत असेल हे चुकीचे आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यापद्धतीचे बोलावे लागते तरच न्याय मिळतो नाही तर न्याय मिळत नाही. आणि तुम्ही आता व्हिडिओ काढत असाल तर बाकीच्यांचे पण व्हिडिओ आहेत. यात माफी मागायचा संबंध नाही. माफी मागू पण नाही. हे राजकारण आहे याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेल त्याचा बळी पण घेतला पाहिजे. आपण जातीने क्षत्रिय मराठा आहोत. जुने व्हिडिओ पसरवायचे आणि माघार घ्यायला लावायचे हे जर सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतील. मी समाजाला पुन्हा सांगतो निवडणुकीत उभ्या असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
Maratha Activist Manoj Jarange Plays Maratha Card in Civic Polls, Seeks Support for Community Workers
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड