विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : राज्यातील कोट्यावधी जनतेवर हजारो कोटी रुपयांच्या कराचा व १२ जिल्ह्यामधील हजारो एकर सुपीक जमीनी पिकविणा-या शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारा शक्तीपीठ महामार्ग राज्य सरकारने कितीही दडपशाहीचा वापर करून करण्याचा प्रयत्न केला तरी तो राज्यभर आंदोलनाची तीव्रता वाढवून हाणून पाडणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या ॲानलाईन बैठकीत मांडली. Raju Shetti
गेल्या दोन दिवसापासून राज्य सरकारने सुधारीत शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी पोलिसांना हाताशी धरून शेतकरी , महिला यांना रात्री अपरात्री अटक करून दडपशाहीने मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे. परभणीसह राज्यातील विविध भागात गेली दोन दिवस शेतकरी या महामार्गास कडाडून विरोध करू लागला आहे.राज्यातील जनतेला व शेतकऱ्यांना नको असणाऱ्या या महामार्गाच्या प्रकल्पात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ५० हजार कोटींचा ढपला पाडायचा असल्याने त्यांनी शक्तीपीठ महामार्ग करण्याचा विडा उचलला आहे.
रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग सध्या अस्तित्वात असून तो तोट्यात चाललेला असून या महामार्गाला समातंर शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जात आहे. राज्य सरकार आर्थिक दृष्ट्या दिवाळखोरीत निघण्याच्या मार्गावर असताना राज्यातील कंत्राटी कामगार यांचे पगार खकीत आहेत , ठेकेदार यांची ८० हजार कोटींची देणी आहेत , जलजीवन योजनेतील हजारो कोटींची देणी थकीत आहेत , कृषी विभागातील यांत्रिकीकरण व अन्य विभागांची अनुदाने प्रलंबित आहेत असे असताना राज्यातील जनतेवर १ लाख कोटींचा कर्जाचा बोजा टाकून या महामार्गाची उभारणी कशासाठी?
शक्तीपीठ महामार्गाचा प्रतिकिलोमीटर १२५ कोटी रूपयापेक्षा जास्त खर्च केला जात आहे. एकीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रतिकिलोमीटर ३५ ते ४० कोटी रूपये खर्चून सहा पदरी रस्ता करत असताना राज्य सरकारचा इतका खर्च कसा येवू लागला आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास ५० हजार कोटींचा ढपला पाडणार असल्यानेच हा प्रकल्प राज्यातील जनतेवर व शेतक-यांवर लादला जात आहे. या बैठकीस आमदार सतेज पाटील , आमदार कैलास पाटील , मा. आमदार राजेश पाटील , मा. आमदार ऋतुराज पाटील, समन्वयक गिरीश फोंडे यांचेसह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Raju Shetti Warns of Intensifying Agitation Against Shaktipeeth Highway
महत्वाच्या बातम्या
- सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका
- राज्यसभेत शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अटी
- शिवजयंतीनिमित्त महसूल विभागाची मोठी घोषणा; एका दिवसात १५ महसूल सेवा निकाली काढणार
- रोहित पवार यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, सुप्रिया सुळे यांची मागणी