Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणखी एक विक्रम, ट्रम्प यांना मागे टाकत इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स असलेले एकमेव नेते

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Prime Minister Narendra Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्सचा विक्रम केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी मागे टाकले आहे.2014 मध्ये त्यांनी इन्स्टाग्रामवर खातं उघडलं होतं. एका तपात तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचली.Prime Minister Narendra Modi

\पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. असा जागतिक रेकॉर्ड करणारे ते एकमेव नेते आहेत. 2014 मध्ये पंतप्रधानांनी इन्स्टाग्राम खाते उघडले होते. तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता वाढत गेली.Prime Minister Narendra Modi



 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. अनेकदा संवाद साधतात. विविध विषयांवर त्यांचे विचार मांडतात. इन्स्टाग्राम हा तरुणाईचा प्लॅटफॉर्म मानला जातो. त्यामुळे तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख अधोरेखित झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या काळात डिजिटल इंडियाने मोठी भरारी घेतली. 2014 ते 2026 पर्यंत कोट्यवधी भारतीयांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट आले.

मोदी यांच्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक आहे. त्यांचे 43.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे 15 दशलक्ष, ब्राझीलचे राष्ट्रपती लूला हे 14.4 दशलक्ष, तुर्कीचे राष्ट्रापती रजब तैयप एर्दोगान यांचे 11.6 दशलक्ष तर अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मिलेई यांचे 6.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्टाग्रामवर आतापर्यंत 1205 पोस्ट केल्या आहेत. पंतप्रधान इन्स्टाग्रामवर कुणालाच फॉलो करत नाहीत. पण त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा हा 10 कोटींच्या पुढे गेला आहे. पंतप्रधान मोदी यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा 10 कोटीहून अधिक आहे.

Prime Minister Narendra Modi Sets New Record, Becomes Only Leader with 100 Million Instagram Followers, Surpasses Donald Trump

महत्वाच्या बातम्या