विशेष प्रतिनिधी
काेल्हापूर : सातारा ड्रग्ज प्रकरणात पडलेली ही रेड केवळ शेडवर नव्हे, तर थेट प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर पडल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. संबंधित लोक हे त्या रिसॉर्टमध्येच राहत होते आणि तिथेच ड्रग्ज साठा आढळून आला असल्याचा आराेप त्यांनी केला आहे. Sushma Andhare
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यातील दरे गावाजवळील सावरी परिसरात 115 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 किलो वजनाचा ड्रग्ज साठा जप्त झाल्याची घटना समोर आली हाेती. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर संबंधित हॉटेल आणि मालमत्तेच्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. ही मालमत्ता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असून तिची देखभाल दरे गावचे सरपंच रणजीत शिंदे करत असल्याची माहिती समोर आली होती. दबावामुळे कारवाई थंडावल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून हाेत असून सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप आणि प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, सावरी, जिल्हा सातारा येथे ड्रग्जसंदर्भात धाड पडून जवळपास महिना लोटला असतानाही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. मुलुंड आणि वर्धा येथे धाड पडल्याची माहिती तत्काळ जाहीर झाली होती, पुण्यातून विशाल मोरे याला अटक झाल्याचंही कळालं होतं. मात्र, 115 कोटींच्या ड्रग्जसारख्या मोठ्या प्रकरणात ना पत्रकार परिषद, ना सीसीटीव्ही फुटेज, ना जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती पुढे येत असल्याने संशय अधिक गडद होत आहे.
प्रकाश शिंदे हे या प्रॉपर्टीशी आपला संबंध नसल्याचं सांगत असून, ती मालमत्ता विकल्याचा दावा करत आहेत. मात्र, हा दावा खोटा असल्याचा आरोप करत अंधारे म्हणाल्या की, शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात केवळ काही ग्रॅम ड्रग्ज सापडले असतानाही मोठ्या प्रमाणावर कारवाई आणि पत्रकार परिषदा झाल्या. मग सावरी येथे 115 कोटींचा ड्रग्ज साठा सापडूनही अशी शांतता का? रेड टाकणारे पोलिस निरीक्षक आत्मजित सावंत सध्या कुठे आहेत? त्यांच्या जिवाला काही धोका आहे का, ते सुरक्षित आहेत का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती का दिली जात नाही? एवढ्या मोठ्या कारवाईनंतर संबंधित अधिकारीच समोर येत नसतील तर सामान्य नागरिकांनी विश्वास कसा ठेवायचा?
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सावरी परिसरातील बॅकवॉटर भागात मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाले असून सुमारे 1200 मीटरचे रस्ते उभारण्यात आले आहेत. हे बांधकाम कोणी केले, त्यासाठी परवानगी कोणी दिली, याची माहिती पालकमंत्री देसाई का देत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकाश शिंदे यांनी दाखवलेली कागदपत्रे ही सर्वे नंबर 17 ची असून प्रत्यक्षात संबंधित मालमत्ता सर्वे नंबर 13 मधील आहे. यावरूनच त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून ढ असल्याचा घणाघात केला.
अंधारे म्हणाल्या, या ड्रग्ज प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे स्पॉटवर उपस्थित असलेला ओंकार डिगे सध्या कुठे आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचं अंधारेंनी सांगितलं. संबंधित गावचा सरपंच, जो युवा सेनेचा पदाधिकारी असल्याचं सांगितलं जातं, तोही सध्या कुठे आहे, याबाबत स्पष्टता नाही. 115 कोटींचा ड्रग्ज साठा सापडूनही प्रमुख संशयित किंवा संबंधित व्यक्ती गायब असणं हे अत्यंत गंभीर असल्याचे त्या म्हणाल्या.
The Raid Was Not Just a Shade, It Was Directly on Prakash Shinde’s Resort,” Alleges Sushma Andhare
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut : संजय राऊतांच्या घराबाहेर ‘बॉम्ब’ची धमकी! बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
- ईव्हीएमवरील ईएनडी बटण बंद, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निर्णय
- निष्ठावंत कार्यकर्ते म्हणत मेधा कुलकर्णींची सूचक पोस्ट; म्हणाल्या, ‘कुछ कह गए, कुछ सह गए…’,
- लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात; आरटीआयमधून मोठा गैरप्रकार उघड