विशेष प्रतिनिधी
पुणे: महापालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Rupali Thombare
नेमकी घटना काय ?
ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास टिळक रस्त्यावरील डी.ई.एस. न्यू इंग्लिश स्कूलमधील मतमोजणी केंद्रावर घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
रूपाली ठोंबरे यांनी त्यांच्या हरकत अर्जाची पोचपावती मागण्यासाठी मतमोजणी केंद्रातील सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड केली.
त्यांच्या समर्थकांनीही मतदान केंद्रात गोंधळ घालून सुरक्षा व्यवस्थेचा भंग केला.
यामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कोणी केली तक्रार?
याप्रकरणी कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता सुधीर पांडुरंग आलुरकर यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
निवडणुकीचा निकाल काय लागला ?
रूपाली ठोंबरे यांनी प्रभाग २५ आणि २६ अशा दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा धक्का बसला:
१. प्रभाग २५: येथे भाजपच्या स्वप्नाली पंडित (२२,९८७ मते) विजयी झाल्या, तर ठोंबरे यांना ४,५३२ मते मिळाली. या प्रभागात त्या १८,४५५ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्या.
२. प्रभाग २६ (ब): येथे भाजपच्या स्नेहा माळवदे (१२,५९३ मते) यांनी ठोंबरे (९,०९४ मते) यांचा ३,४९९ मतांनी पराभव केला.
Election Vote Counting Chaos: Case Registered Against NCP Leader Rupali Thombare!
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin : लाडक्या बहिणींची पुन्हा झाडाझडती, २२ ते २५ लाख महिलांच्या ई केवायसीची तपासणी होणार
- नाद कुणाचाही करा, पण देवाभाऊ यांचा नाही, जयकुमारे गाेरे यांचा अभिजीत पाटलांना इशारा
- नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ, विजय वडेट्टीवार यांचा आरोप
- कामटी जि.प. गटावरून वाद पेटला; सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका!