Prakash Mahajan : कुत्र्याला सर्दी झाली म्हणून दुष्काळी दौरा रद्द करणारे…प्रकाश महाजन ठाकरे बंधूंवर बरसले

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Prakash Mahajan  कुत्र्याला सर्दी झाली म्हणून दुष्काळी दौरा रद्द करणारे, घरातील मासा मेला म्हणून सूतक पाळणारे कधीही लोकनेते होऊ शकत नाही, असा खोचक टोला महाजन यांनी ठाकरेंवर लगावला आहे.Prakash Mahajan

छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. प्रकाश महाजन म्हणाले, मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यात मला गोपीनाथ मुंडे यांची छबी दिसते. गोपीनाथ मुंडे देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे उशिरा यायचे. एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकनेता म्हणून पाहू शकतो. लोकनेता शिंदे यांच्यासारखा असावा, असे महाजन यांनी म्हटले.Prakash Mahajan



पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, माझे थोडे वय वाढले आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही. तसेच नारायण राणेंना आव्हान देणे भोवले का? असे विचारले असता ते म्हणाले असे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काही नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवले नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असे महाजन यांनी म्हटले.

“Cancelled Drought Tour Over Dog’s Cold”: Prakash Mahajan Slams Thackeray Brothers

महत्वाच्या बातम्या