विशेष प्रतिनिधी
बीड: Manoj Jarange मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट तसेच एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे यांच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली आहे.यावरून हे सगळे घडवून आणतो तो धन्याच असे एकेरी भाषेत आरोप मनोज जरांगे यांनी केली आहे.Manoj Jarange
अमोल खुणे हे जरांगेंचे जुने सहकारी देखील होते. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले असून अमोल खुणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असे जरांगे म्हणाले.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. परळीचे खरखट गप्प बसणार नाही. जामीन झाले की पुन्हा पुन्हा तो कट रचणार, असे म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. हे सगळे घडवून आणतो तो धन्याच आहे.Manoj Jarange
अमोल खुणेच्या यांच्यावर बोलताना जरांगे म्हणाले, तू धुतल्या तांदळाचा होता तर तू म्हणायला पाहिजे होते की धन्यासहीत नार्को टेस्ट करा. खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितले होते की तो पितोय. हे पोरगं असा आहे की स्वतः सुखाने खायचे नाही घरच्याला सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी एसपींना सांगितले. तुला कोणी सांगितले गेले का किंवा याने इसार घेतला होता का?
मनोज जरांगे म्हणाले, झालेले आरोप सिद्ध करावे लागतील नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत, आता सुट्टी नाही. आंदोलनाचे जे आरोप करायचे आहे त्याचे तुला पुरावे द्यावे लागतील नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील. तुझं पुढे बघ आता काय काय होतं तू फक्त नीट राहू नकोस इथून पुढे, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतो का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे
Parli Will Not Stay Silent, Dhananjay Munde Is Behind It All: Manoj Jarange Levels Direct Allegations
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,