विशेष प्रतिनिधी
नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांमुळे पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचा प्रदेश भारताच्या ताब्यात घेता आला नाही, असा आरोप भाजप नेते सुनील देवधर यांनी केला. नेहरू पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली होते आणि मातृभूमीबाबत त्यांच्यात आपलेपणाची भावना नव्हती, असेही ते म्हणाले. Sunil Deodhar
नागपूरमधील येथे श्री शक्तिपीठ फाउंडेशनतर्फे आयोजित श्री दास नवमी उत्सवात ‘संघ आहे म्हणून’ या विषयावर झालेल्या व्याख्यानात देवधर बोलत होते. जिथे काही पिकत नाही ती भूमी काय उपयोगाची,” अशा विचारांमुळे नेहरूंनी सीमावर्ती प्रदेशांकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागला, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी नेहरू कुटुंबाच्या विचारसरणीवरही टीका केली.
देवधर म्हणाले की पंडित नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्या नावासमोर एकदा ‘हिंदू’ असे लिहिले गेले असता, “मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच जवाहरलाल नेहरू यांनीही “माझा जन्म हिंदू कुटुंबात चुकून झाला,” असे विधान केल्याचा दावा देवधर यांनी केला.
देवधर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडे यांच्याकडे शाश्वत स्वातंत्र्याचा स्पष्ट मार्ग होता. संघाच्या पहिल्या शाखेपासून स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात आपापल्या परीने योगदान दिले. तरीही राजकीय स्वार्थातून संघाने काय केले, असा प्रश्न उपस्थित केला जातो, हे दुर्दैवी आहे.
“आम्ही कधीही महात्मा गांधींच्या मार्गावर प्रश्न उपस्थित केले नाहीत, मग संघाच्या देशभक्तीवर प्रश्न का उपस्थित केले जातात?” असा सवालही देवधर यांनी केला. जर देशात संघासारखे लोकमत नसते, तर १९४७ नंतरही देशाचे अनेक तुकडे झाले असते, असा दावा त्यांनी केला.
संघाने ध्येयविहीन आणि आत्मविस्मृत हिंदू व भारतीय समाजाला दिशा दिली असून व्यक्तिनिर्माणावर भर दिला, असे देवधर म्हणाले. संघाने देशातील विविध समाजांना मुख्य प्रवाहात आणले. विशेषतः ईशान्य भारतात शून्यापासून सुरुवात करून तेथील समाजांमध्ये देशाबाबतची आत्मीयता निर्माण केल्याचेही त्यांनी नमूद केले.
Nehru’s Policies Cost India PoK and Aksai Chin, Alleges Sunil Deodhar
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक