विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Prashant Kishor रणनितीकार आणि बिहारमधील जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशाेर (Prashant Kishor) यांना सर्वाेच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आतुमच्या पक्षाला किती मते मिळाली? लोकांनी तुम्हाला नाकारले, म्हणून तुम्ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोर्टात आलात का? अशी थेट विचारणा सरन्यायाधिशांनी केली.
बिहार विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या जनसुराज पक्षाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ऐकण्यास नकार दिला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करू शकत नाही.
खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकेत संपूर्ण निवडणूक रद्द करण्यासाठी व्यापक आदेश मागितले आहेत. मात्र, निवडणूक प्रक्रियेत भ्रष्टाचाराचा आरोप असेल, तर प्रत्येक उमेदवाराविरोधात आणि प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्र याचिका दाखल करणे आवश्यक आहे. या प्रकारची याचिका दाखल करण्याचा योग्य मंच उच्च न्यायालय (High Court) असल्याचेही कोर्टाने नमूद केले.
जनसुराज पक्षाकडून वरिष्ठ वकील चंदर उदय सिंह यांनी युक्तिवाद केला की, आदर्श आचारसंहिता लागू असताना 25 ते 35 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. निवडणुकीच्या अगदी आधी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनांचा थेट निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता.
या युक्तिवादावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, तुम्ही योजनेला नव्हे, तर संपूर्ण निवडणुकीलाच आव्हान दिले आहे आणि पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. मोफत योजनांचा (Freebies) मुद्दा आम्ही आधीपासूनच गांभीर्याने पाहत आहोत. आम्हालाही यावर विचार करायचा आहे, पण निवडणूक हरलेल्या पक्षाच्या सांगण्यावरून नाही. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला स्पष्टपणे सांगितले की, हा संपूर्ण देशाचा मुद्दा नाही, यावर उच्च न्यायालयात अपील करता येईल, तेथे या बाबींचा विचार होऊ शकतो.
Did you come to court to gain fame? Supreme Court asks Prashant Kishor
महत्वाच्या बातम्या
- राहूल गांधींना खाेट्या आरोपांनी फक्त चर्चेत राहायचंय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाेरदार हल्लाबाेल
- Shaktipeeth Project : शक्तिपीठचा खर्च १ लाख कोटी, महामार्ग आता १२ ऐवजी १३ जिल्ह्यांतून जाणार
- जुन्या मैत्रिणीला कॉल करण्यावरून वाद, जिवलग मित्राने पाठलाग करत दुसऱ्यावर केले काेयत्याने सपासप वार
- भारत आणि अमेरिका यांच्यातील नवा व्यापार करार शेतीसाठी चिंताजनक,