शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली, पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करणार

विशेष प्रतिनिधी

पुणे / बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे. सध्या ते बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी होते. Sharad Pawar

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना कफ आणि सर्दीमुळे श्वसनाचा त्रास जाणवू लागला. श्वास घेण्यास अडचण होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक उपचारांसाठी त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात येणार आहे.



निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गंभीर बाब नसून किरकोळ आजारपण आहे. पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही. उपचार झाल्यानंतर ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईकडे रवाना होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांकडून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवण्यात येत असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Sharad Pawar’s Health Deteriorates Suddenly, To Be Admitted to Pune’s Ruby Hall Clinic

महत्वाच्या बातम्या