विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची निवड झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडीवर शिक्कामोर्तब केले आहे. Shrinath Bhimale
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतचे अधिकृत पत्र गटनेते गणेश बिडकर यांना पाठवून भिमाले यांच्या उमेदवारीला मान्यता दिली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. मात्र पक्ष नेतृत्वाने अखेर भिमाले यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविल्यामुळे स्थायी समितीवरील संख्याबळही पक्षाकडेच आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड औपचारिकता ठरणार आहे. स्थायी समिती ही महापालिकेतील सर्वात महत्त्वाची आर्थिक समिती मानली जाते. कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया आणि विविध विकासकामांवर अंतिम निर्णय घेणे अशी महत्त्वाची जबाबदारी या समितीवर असते.
भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र पक्षाने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच पसंती दिली होती. आता भिमाले यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संधी मिळाली आहे.
Shrinath Bhimale Set to Be Elected as Pune Standing Committee Chairman
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती