विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीच्या सोहळ्याला आज गालबोट लागले. शिवरायांच्या जन्मस्थानी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने गडावर चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र चेंगराचेंगरी झाली नाही असे पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांच्याकडून सांगण्यात आले . Shiv Jayanti
शिवजयंती निमित्त काल मध्यरात्रीपासूनच शिवनेरीवर शिवज्योत घेऊन येणारे युवक आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी ही गर्दी लाखांच्या घरात पोहोचली. गडावरील अंबरखाना, हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा हे मार्ग अत्यंत अरुंद आहेत. या भागात अचानक गर्दीचा दाब वाढला आणि लोक एकमेकांवर पडू लागले. एकाच वेळी हजारो लोक पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. Shiv Jayanti
दरवर्षी शिवनेरीवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, हे माहीत असतानाही यंदा पोलीस बंदोबस्त पुरेसा नसल्याचे दिसून आले. अरुंद वाटांवर बॅरिकेडिंग किंवा एकेरी वाहतुकीचे (Entry-Exit Plan) नियोजन नसल्याने ही दुर्घटना घडली. . जखमींना तातडीने जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. Shiv Jayanti
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त आणलेल्या शिवज्योतीदरम्यान झालेल्या गोंधळाबाबत ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. गिल यांनी सांगितले की, शिवज्योत गडावरून खाली आणताना एका व्यक्तीचा पाय घसरून तो पडला. त्याच्या पुढे चालणारे आणखी दोन जण देखील पडल्याने त्या ठिकाणी काही काळ गर्दी झाली. यामुळे उपस्थित शिवभक्तांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा प्रकार चेंगराचेंगरीचा नसून अपघाती पडझडीमुळे झालेली किरकोळ धावपळ असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली असून कोणतीही गंभीर जखमीची नोंद झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.Shiv Jayanti
Stampede at Shiv Jayanti Celebration at Shivneri Fort; Three Injured
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती